पुणे : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्द्दीत खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जस्टीस बोरकर यांचे खंडपीठाने हा आदेश दिला आहे. आरोपीवर खुनाचा गुन्हा जेजुरी पोलिसांनी दाखल केला होता.
दत्ता ठोंबरे असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन चे कॉन्स्टेबल देवेंद्र खाडे यांनी फिर्याद दिली होती. ठोंबरे याने अँड शैलेश खरात व अँड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ ऑक्टोंबर २०२० रोजी आरोपी दत्ता ठोंबरे, मुकुंद पाटील व मयत सागर बापू शिंदे असे तिघे दारू प्यायला मुकुंद शिंदे यांच्या घरासमोर बसले होते. त्यानंतर दारू जास्त झाल्यामुळे दत्ता ठोंबरे आणि सागर शिंदे यांच्यात दारूच्या कारणामुळे भांडणे झाली. आरोपी दत्ता ठोंबरे याने मयत सागर शिंदे यांचे डोक्यात फारशी-विटकरीने मारल्यामुळे जागीच मृत्य झाला होता. त्यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल देवेंद्र खाडे यांच्या फिर्यादीने आरोपी ठोंबरेच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार केली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपी ठोंबरे याने अँड शैलेश खरात व अँड नितीन भालेराव यांच्या द्वारे मुंबई उच्च न्यायालयात जमिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने व रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालावरून आरोपी यास सशर्त जामिनावर सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या जस्टीस बोरकर साहेबांच्या खंडपीठाने पारित केले. अशी माहिती आरोपीचे वकील अँड नितीन भालेराव यांनी दिली.