हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : मतदारांनी मागील पाच वर्षात सधी दिल्याने, ग्रामपंचायत हद्दीत पाच वर्षात झालेला विकास हा विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. प्रचारात प्रभावी मुद्दे नसल्याने विरोधकांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुरु केले आहेत. दम असेल तर त्यांनी पुराव्यासह जनतेसमोर जावे. जनताच आमच्या कामाचा फैसला मतदानातुन करणार असल्याने, रविवारी (ता. १८) मतदारराजा “नवपरिवर्तन पॅनेल” च्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या “नवपरिवर्तन पॅनेल”च्या सांगता सभेचे आयोजन शुक्रवारी (ता. १६) करण्यात आले होते. यावेळी चित्तरंजन गायकवाड बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोणी काळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर होते.
यावेळी यावेळी विद्यमान सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच देविदास काळभोर, राहुल झेंडे, धनंजय कामठे, जगन्नाथ लडकत, प्रीतम गायकवाड, माऊली काळभोर, संजय काळभोर, मुकुंद गणपत काळभोर, संदेश काळभोर, अशोक शिंदे, शिवाजी कदम, सूर्यकांत नामुगडे, गुरुदेव जाधव, रमेश कोतवाल, आकाश काळभोर, सिमिता लोंढे, कोमल काळभोर, बीना काळभोर, मंदाकिनी नामुगडे, राजश्री काळभोर, दीपक अढाळे, सुनंदा काळभोर, नासीरखान पठाण, अभिजित बडदे, रुपाली काळभोर, स्वप्नील कदम, अविनाश बडदे, सोनाबाई शिंदे, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढे बोलताना गायकवाड म्हणाले, मागील पाच वर्षाच्या काळात आम्ही केलेली विकास कामे जनतेच्या समोर आहेत. विकास कामांच्यावर बोलण्याची हिंम्मत नसल्याने, विरोधकांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुरु केले आहेत. स्वतः काही करायचे नाही आणि लोकांनी केलेल्या कार्यात खोडा घालण्याचे काम विरोधी पॅनेल करीत आहे. विरोधी पॅनेलनच्या प्रमुखाकडे सत्ता असतांना, त्यांनी कदमवाकवस्तीचा विकास सोडून स्वत:चा विकास केला. सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात करून या गावांमध्ये विविध प्रकारे पैसे कमाविले. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पाच वर्षे भ्रष्टाचार केला असेल तर, तुन्हा पाच वर्षे झोपला होता का. त्याचवेळी का आवाज का उठवला नाही. तुमच्यात दम असेल तर, आम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचे पुराव्यासह जनतेसमोर जावे असे आमचे विरोधकांना आवाहन आहे.
सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “मागील पाच वर्षाच्या झालेली विकास कामे पहाता, विरोधकांना आता टीका करण्याशिवाय दुसरे काहीच काम आम्ही ठेवलेले नाही. यामुळे विरोधक नको ती टीका करत आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठा निधी आणून गावात विकास कामे मतदारांनी पाहिली आहेत. आगामी काळात मतदारांना विकास हवा आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलच्या मागे मतदारांनी आपली मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे माझी ताकद हे माझे सर्व कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास असणारी सर्व जनता आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विकासासाठी, उद्धारासाठी कायमच कटिबद्ध आहोत”
माजी उपसरपंच देविदास काळभोर म्हणाले, “चित्तरंजन गायकवाड हे आपल्या कदमवाकवस्तीला लागलेला कोहिनूर हिरा आहे. कदमवाकवस्ती हि भयमुक्त करायची आहे. पुढील पंचवीस वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, रस्ते, शाळा, क्रीडांगण आदी पायाभूत सोयीसुविधा कशा प्रकारे राबवायच्या या संदर्भातील विकास आराखडा तयार केला आहे. त्यामुळे चित्तरंजन गायकवाड मोठ्या मतांनी निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
अविनाश बडदे म्हणाले, “कोरोना काळात संभाजीनगर मधील नागरिकांना ढुंकून न बघणारे आज ताई, माई, साहेब, लक्ष असुद्या अशा विनवण्या करीत आहेत. मात्र संभाजीनगरमधील सुज्ञ नागरिक हा कामाचा कोण व कामापुरता कोण हे ओळखीत आहे. अर्ध्या रात्री व एखादी घटना घडली यावेळी हा अविनाश बडदे कायम नागरिकांच्या सुख व दुखा:त उभा आहे. त्यामुळे कोणी तुम्हाला पैशाची भूल देऊन मतदान करायला भाग पाडत असेल तर पैसे घ्या व मतदान हे “नवपरिवर्तन पॅनेल” च्या उमेदवारांनाच द्या असेही आवाहन अविनाश बडदे यांनी केले.