पुणे : दौंड – अहमदनगर रोडवर आरणगाव हद्दीत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ५४ लाख ०२ हजार ५०० रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकच्या पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रजत आसाराम पांडे (वय-२३, रा. घर नं. १४, वॉर्ड नं. १६ रोल गाव ता. सिराली जि. हरदा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्यसाठा व बिअर परवानगी असलेले रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की या ब्रॅण्डच्या १८० मि. ली. क्षमतेच्या ३३ हजार ६०० सिलबंद बाटल्या (७०० बॉक्स) मिळून आले. तसेच आयशर कंपनीचा सहा चाकी टॅम्पो, एक मोबाईल फोन असा ५४ लाख ०२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १५) राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, दौंड – अहमदनगर रोडवर आरणगाव हद्दीत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची मिळाली होती. त्या अनुषंगाने मद्याची वाहतूक होणार असल्याची मिळाली होती.
त्या अनषंगाने निरा गावचे परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर सापळा रचून ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने सदर ट्रक रोडच्या कडेला उभा केला.
दरम्यान, सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळून आला. त्यानुसार ट्रकचालकास विचारपूस केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले. ट्रकची तपसणी केली असता पोलिसांनी गोवा राज्यात विक्रीस असलेले ५४ लाख ०२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एस. व्ही. बोधे, ए.सी. फडतरे, जवान स्टाफ, प्रताप कदम, सतीश पोंधे, अनिल थोरात, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, अमोल दळवी तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, अहमदनगर या कार्यालयाचे दुय्यम निरीक्षक प्रदिप झुंजरुक व जवान प्रविण सागर यांनी सहभाग घेतला आहे.