पुणे : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं, या मालिकेत बाळूमामाची मुख्य भूमिका साकारलेला मुख्य अभिनेता नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. सुमीत पुसावळे याने मोनिकासोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे.
सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला असून या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. त्याचा साखरपुडा समारंभ आणि हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे.
बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.