नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड फेकल्याची घटना घडली असून या घटनेत मुलीच्या चेहऱ्यावर गंबीर जखम झाली आहे. श्रद्धा वालकर प्रकरण अजून ताजे असतानाच ही घटना घडल्याने दिल्लीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरी आल्याचे अधोरेखित होत आहे.
ट्विटर लिंक :
देश की राजधानी में दिन दहाड़े एक स्कूली बच्ची पर 2 बदमाश दबंगई से तेज़ाब फेंककर निकल जाते हैं… क्या किसी को भी अब क़ानून का डर है ? क्यों तेज़ाब पर बैन नहीं लगाया जाता ? SHAME pic.twitter.com/kaWWQYey7A
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) December 14, 2022
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित मुलगी दिल्लीतील द्वारका येथे १२ वीत शिकत आहे. आज सकाळी पीडित मोहन गार्डनजवळ आपल्या लहान बहिणीसोबत उभी होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पीडितेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. या घटनेनंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाले.
या घटनेने एकाच खळबळ माजली आहे. पीडित व हल्ला करणारे एकमेकाना ओळखत आहेत, असे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. पीडितेने दोन मुलांवर संशय व्यक्त केला असून त्यानुसार एकाला पोलिसांनी पकडले असल्याची माहिती मिळत आहे. पीडितेला उचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
कुणाला पोलिसांची भीती वाटते का असा प्रश्न उपस्थित करताना हा व्हिडीओ एका दिल्लीतील महिलेने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या महिलेने सीसीटीव्हीचीच्या फुटेजची क्लिप पोस्ट केली आहे.