अजित जगताप
सातारा : छत्रपती शिवाजी विद्यालय, वावंजे ता पनवेल प्राचार्य व रयत शिक्षण संस्था रायगड विभाग सह.विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शहाजी शंकर फडतरे यांना सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार महाराष्ट् विधान परिषद,उपसभापती डॉ निलमताई गोऱ्हे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास आ. अदिती तटकरे,.आ. बाळाराम पाटील, माआ मनोहर भोईर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनपाटील, जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते पनवेल मनपा प्रितम म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रायगड, महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत पाटील,भावना घाणेकर-प्रदेश सचिव महिला राष्ट्रवादी काँग्रेस,कार्यक्रमाचे आयोजक कांतीलाल कडू-अध्यक्ष पनवेल संघर्ष समिती आदी मान्यवर उपस्थित होते
सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली ता खटावचे सुपुत्र श्री शहाजी फडतरे यांचा पनवेल येथे कांतीलाल प्रतिष्ठान ,रायगड व पनवेल संघर्ष समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.कुरोलीचे माजी सरपंच राजू फडतरे यांचे चुलत भाऊ व ग्रामपंचायत सदस्या सौ आशा सर्जेराव फडतरे यांचे दिर आहेत. त्यांनी अनुकूल परिस्थिती वर मात करून शिक्षण घेतले आहे.
रायगड जिल्ह्यात कार्यरत राहून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गौरवाबद्दल ‘मी वडार महाराष्ट्र’ संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष व शिवसेना नेते विजय चौगुले , माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख,जि प सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती संदीप मांडवे, डॉ महेश गुरव, इम्रान बागवान,विजय शेटे,धनंजय चव्हाण, आर. पी. आय. जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश,पत्रकार अजित जगताप, तुकाराम खाडे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.