उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलींनी जिल्हास्तरीय “टेनीक्वाईट” स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय “टेनीक्वाईट” स्पर्धेचे आयोजन बारामती येथील टी. सी. महाविद्यालयात बुधवारी (ता. ०७) आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन या विद्यालयाच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलींनी व मुलांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, या स्पर्धेत १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलींनी व १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडली आहे. महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी सर्व खेळाडूंचे व शारीरिक शिक्षण विभागाचे कौतुक केले.`