उरुळी कांचन, (पुणे) : कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रकाश जगताप यांची सहकारमंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ०५ डिसेंबर) त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला.
प्रकाश जगताप हे मुळचे बेलसर (ता. पुरंदर) येथील असून त्यांनी विक्रीकर विभागात काम केले आहे. त्यानंतर उपनिबंधक नागपूर म्हणून त्यांनी चार वर्ष काम केले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांची कोल्हापूर शहर उपनिबंधक म्हणून बदली झाली होती.
दरम्यान, कोल्हापूर येथील शेती उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. आता त्यांची सहकारमंत्री अतुल सवे यांचे विशेष सहकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सदस्य मिलिंद जगताप यांचे ते बंधू आहेत.