Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोसरीमधील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 December 2022, 19:09

पुणे : भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महापारेषणच्या सेन्चुरी इन्का २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात येणार आहे.

भोसरीमधील प्रामुख्याने औद्योगिक व इतर सर्व ग्राहकांना होणाऱ्या वीजपुरवठ्यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार (महावितरण) आणि राजेंद्र गायकवाड (महापारेषण) यांनी भोसरी येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रासह इतर वीजयंत्रणेची संयुक्तपणे नुकतीच पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, सतीश गायकवाड व भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले उपस्थिती होती.

भोसरी एमआयडीसी व इतर परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या भोसरी आरएस-१ या अतिउच्चदाबाच्या २२०/२२ केव्ही उपकेंद्रामधील पॉवर ट्रॉन्सफॉर्मर्सची पूर्वीची क्षमता सध्या ४० एमव्हीएने कमी झाली आहे. परिणामी या उपकेंद्रातील तीनही पॉवर ट्रॉन्सफॉर्मर अतिभारित झाले आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्यात काही वेळा अडथळे निर्माण होत आहेत. ते दूर करण्यासाठी मुख्य अभियंता राजेंद्र पवार व राजेंद्र गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये महापारेषणच्या सेन्चुरी इन्का या २२०/२२ केव्ही उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याबाबत संयुक्तपणे प्रस्तावित करण्यात आले. यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

 

सेन्चुरी इन्का उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मरमुळे भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरात दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. सध्या असलेल्या वीजवाहिन्यांची लांबी तसेच त्यावरील वीजभार कमी होणार आहे. परिणामी वीजपुरवठा देखील विनाव्यत्यय व योग्य दाबाने सुरळीत राहणार आहे. भोसरी विभाग कार्यालयाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी यावेळी दिले. तसेच भोसरी विभाग अंतर्गत भोसरी उपविभागामध्ये दिघी व इंद्रायणीनगरमध्ये तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिखली येथे नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

मावळ तालुक्यातील तैलबैला गडावर ट्रेक करताना रोप तुटून कात्रज येथील २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.