अजित जगताप
सातारा : पुणे येथे नुकत्याच महाराष्ट्र कारागृह पोलीस विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा कारागृह अधिकारी प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाल्या. यामध्ये तीन पोलीस खेळाडूंनी बारा पदकाची चमकदार कामगिरी केली आहे.
पुणे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह मुख्यालय, कारागृह उपमुख्यालय, प्रशिक्षण केंद्र, येरवडा, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, विसापूर, आटपाडी, सांगली अशा अनेक मुख्य कारागृह व सातारा कारागृह साधारण शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी खेळाडू विभागातील या खेळासाठी हजर होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी कारागृह विभागाच्या पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. सदर क्रीडा स्पर्धांचे उदघाटन पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते झाले. तर क्रीडा स्पर्धाचे पारितोषिक वितरण पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांच्या हस्ते झाले.
सातारा कारागृहाचे खेळाडूंनी महिला व पुरुष कराटे, पुरुष कुस्ती, रस्सीखेच, थाळीफेक, महिला डबल बॅडमिंटन, महिला सिंगल, रिंग टेनिस अशा विविध खेळांमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली.
महिला शिपाई सोनाली साळुंखे –
थाळीफेक – गोल्ड मेडल,
डबल बॅडमिंटन – गोल्ड मेडल,
रिंग टेनिस – सिल्वर मेडल,
कराटे – सिल्वर मेडल
महिला शिपाई वैशाली जाधव –
डबल बॅडमिंटन – गोल्ड मेडल,
सिंगल बॅडमिंटन – ब्राँझ मेडल
थाळीफेक – ब्राँझ मेडल,
रिंग टेनिस – सिल्वर मेडल,
कराटे – सिल्वर मेडल
शिपाई बालाजी मुंडे –
९२ किलो गट कुस्ती – गोल्ड मेडल,
कराटे – सिल्वर मेडल,
रस्सीखेच – सिल्वर मेडल
या पोलीस खेळाडूंना कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, श्री भापकर, श्रीमती कुंटे यांनी मार्गदर्शन केले.