सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणे सामान्य बाब झाली आहे. त्यात काही कपल्स नातं आणखी घट्ट व्हावं यासाठी फक्त प्रेमात न अडकता हे नातं पुढे घेऊन जातात. लग्न करून संसार थाटतात. मात्र, हेच लग्न करताना अनेकदा आपण आपल्या पालकांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचा निर्णय घेतो, तुमचं हेच करणं चुकीचं ठरू शकतं. याने भविष्यात तुम्हालाच त्रास होण्याची जास्त शक्यता असते.
पालकांच्या संमतीने लव्ह मॅरेज करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात तुमचे आई-वडील आयुष्यात अनेक अनुभवांतून गेले असतात. त्यांना लोक आणि नातेसंबंधांची खोल समज असते. ते तुम्हाला सल्ला देऊ शकतात की तुमच्या आवडीची मुलगी किंवा मुलगा तुमच्यासोबत दीर्घकाळ आनंदी जीवन जगू शकेल की नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात कुटुंबाची संमती खूप महत्त्वाची असते. तुमचे पालक तुमच्या निर्णयासोबत असतील, तर समाजही ते सहज स्वीकारतो. हे तुम्हाला सामाजिक दबाव आणि टीका टाळण्यास मदत करते.
प्रत्येक कुटुंबाची स्वतःची परंपरा आणि मूल्ये असतात. पालकांच्या संमतीमुळे या परंपरांचा आदर केला जातो. हे सुसंवादी कौटुंबिक जीवनाचा पाया घालते. लग्नानंतर पती-पत्नीच्या आयुष्यात चढ-उतार येतात. अशा स्थितीत पालकांचा पाठिंबा तुमचे नाते मजबूत करतो. त्यांची संमती तुम्हाला भावनिक आधार देते, जे सुखी वैवाहिक जीवनासाठी फायदेशीर असते.