दौंड, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी (ता.28) पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आळायची माहिती मिळत आहे.
सागर प्रल्हाद रणभावरे (वय 23, रा. नेवासा, जि.अहिल्यानगर) असे भाजलेल्या कामगाराचे नाव आहे. डिस्टिलेशन रेसिडेंट प्रेशर जास्त झाल्यामुळे तो टँक फुटला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, सुरक्षा अधिकारी अकुंश खराडे, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांचे सहकारी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.