उरुळी कांचन, (पुणे) : डाळिंब (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्निल संभाजी जरांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. उपसरपंच सर्जेराव दत्तात्रय म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच बजरंग म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत स्वप्निल जरांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच बजरंग म्हस्के यांनी स्वप्निल जरांडे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामसेवक लता बाचकर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव म्हस्के, सागर म्हस्के, सीमा सुतार, नीलम म्हस्के, माजी सदस्य संभाजी जरांडे, सामाजिक कार्यकर्ते, भगवान जरांडे, गणेश जरांडे, अशोक जरांडे, संदीप जरांडे उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामपंचायत डाळिंबच्या वतीने जरांडे यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित उपसरपंच स्वप्निल जरांडे म्हणाले, “गावच्या सर्वांगिण विकास कामासाठी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली तर सरपंच बजरंग म्हस्के व ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने विकासकामे करणार. येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे.”