सांगवी : पिंपरी- चिंचवड येथील सांगवी मधून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झ्ल्याचे दिसून येत आहे. तसेच चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता महिलेच्या डोक्यात हातोडा मारून गळ्यातील सोन साखळी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने सांगावी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील सांगवी मध्ये एक महिला रस्त्यावरून जात होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोक्यात हातोडा मारला. दरम्यान, महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी घेऊन चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी पुढील तपास सांगवी पोलिस तसेच गुन्हे शाखा आणि गुंड विरोधी पथक करत आहे.