उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील बोरीभडक – चंदनवाडी (ता. दौंड) हद्दीत एसटी बस व दुचाकीच्या अपघातात वळती (ता. हवेली) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब दत्तात्रय कुंजीर (वय-57) यांचे अपघाती निधन झाले आहे.
बुधवारी (ता. 18) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. उरुळी कांचनवरून यवत बाजूकडे जाताना हा अपघात झाला आहे. अपघात कसा झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, बाळासाहेब कुंजीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बाळासाहेब कुंजीर यांच्या अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.