मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दरात ०. ३५ टक्क्यांची वाढ केली असून त्यामुळे रेपो दार आता ६.२५ टक्के झाला असल्याने कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोमवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाविषयक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आपण आणखी एका वर्षाच्या अखेरीस आलो आहोत. जगातील सर्वच देशांमध्ये महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जगातील भूराजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला असल्याने सध्या सर्वांसमोर विविध आव्हाने निर्माण झाली आहेत, असे दास बोलताना म्हणाले.
भारतीयांचे मायक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स मजबूत असल्याने आता परिस्थितीही अर्थव्यवस्था वेगाने वाढणार आहे, असल्याचे दास यांनी सांगितले. तसेच या वर्षांसाठी देखील महागाई दार नियंत्रणाचे आहे. या वर्षात ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दारात घसरण दिसून आली होती.
आगामी आर्थिक वर्षासाठी माहागाई दार हा ६. ७ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.