बापू मुळीक / सासवड : 17 वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे 28 डिसेंबर रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभ कथा कथन, ग्रंथ दिंडी, नाट्य प्रयोग, कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव यांनी दिली आहे.
संमेलन संयोजन समिती बैठकीला राजाभाऊ जगताप, प्रसिद्ध प्रमुख दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, शामकुमार मेमाने, गंगाराम जाधव, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, दत्ता कड ,अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांचे मुळगाव खानवडी मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या समीकरणात राज्यभरातून लेखक, कवी सहभागी होतात. कऱ्हा नदीच्या काठावर रंगणाऱ्या या साहित्य संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक, कवींनी संपर्क साधावा, असे आव्हान दशरथ यादव यांनी केले आहे.