सातारा : साता-यामधून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे-सातारा अँटीकरप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशालाच अटक करण्यात आली आहे. चक्क न्यायाधीशालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात जिल्ह व सत्र न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी या सर्वांना पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्या सर्वांना अटक करण्यात आली. मध्यस्तीनंतर न्यायाधिशांना अटक केल्याची माहिती आहे.
फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.