-संतोष पवार
पळसदेव : पुणे सोलापूर महामार्गावर डाळजजवळ अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे डाळज नं 3 गावाचे हद्दीत ट्रॅक्टर नंबर एम एच 42 क्यू 3255 हा उसाचे बगॅज भरून पुणे बाजू कडून सोलापूर बाजूकडे जात असताना गाडीचे नियंत्रण सुटले. त्यावेळी रोडवर दोन्ही ट्रॉली पलटी झाले होते. सदर ट्रॅक्टर ट्रॉली बाजूस घेण्याचे काम एन एच आय जेसीबीच्या साह्याने करण्यात आले. त्यावेळी ट्रक नंबर नं एम एच 46बी यु9038 पुणे बाजू कडून सोलापूर बाजूकडे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली पडलेले काढण्याचे काम चालू असताना पुढे थांबलेले पाच ते सहा वाहनांना ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातामध्ये समोर उभा असलेला ट्रकवरील चालक जीवन शिंदे (रा. धाराशिव) यास पायाला किरकोळ मार लागला आहे तर थार गाडी नं एम एच 13 बी क्यू 11 16 ही वरील चालक प्रसाद पवार (रा. सोलापूर) यांना किरकोळ मार लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातातील सर्व वाहने खाजगी दोन हायड्राच्या साह्याने बाजूस घेण्यात आले. घटनेस्थळी पोलीस दाखल होऊन पुढील तपास करत आहे.