पुणे : पुण्यातील वडगाव परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका नवजात बालकाला आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तान्हुल्याच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. हा भयंकर प्रकार शहरातील वडगाव परिसरातील रेणुकानगरी येथे सोमवारी (दि. ०९) उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
वडगाव परिसरातील रेणुकानगरी येथे एका नवजात बाळाला आईने त्याचे तोंड प्लॅस्टिकच्या पिशवीने बांधून रस्त्यावर फेकले होते. सोमवारी रात्री आजूबाजूच्या लोकांना बाळाचा दबक्या आवाजात रडण्याचा आवाज आला. ते ऐकून नागरिकांनी तात्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
सध्या बाळाची तब्बेत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड रोड पोलीस घेत आहेत. या घटेननंतर स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
View this post on Instagram