पुणे : वसतीगृहाच्या बाहेर थांबलेल्या मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी चपळाई दाखवताना या तरुणांना तुरुंगवारी घडवून आणली. हा सर्व प्रकार कोथरूड परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरातील एका वसतिगृहाच्या बाहेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीन तरुणी आल्या होत्या. त्याच वेळी बाहेर असणाऱ्या कारमध्ये दोन तरुण बसले होते. यातील एका तरुणाने तिघींपैकी एका तरुणीला पाहून, चलो बैठो, घूम के आते है असे म्हणत आवाज दिला. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने त्या तरुणी देखील घाबरल्या. मात्र, यावेळी तिथून जाणेच मुलीनी पसंत केले.
"चल बैठो घुमने जाते"
कोथरूडमध्ये हॉस्टेल बाहेर कारमध्ये बसलेल्या दोघा तरुणांनी 3 मुलींना 'कॅज्युअल' बोललेले शब्द #PunePolice ने मात्र 'कॅज्युअली' घेतले नाहीत.
Car traced within hours & both men in custody.
????This is #Pune. Eve-teasing in any form will land you in big trouble.
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) December 5, 2022
काही अंतरावर उभे असणाऱ्या पोलिसांना त्यांनी हा प्रकार सांगितला. पोलिसांनी देखील घटनेची गंभीर दाखल घेताना पूर्ण तपशीलवार माहिती घेतली. यातील एका तरुणीने ते तरुण बसलेल्या कारचा नंबर लक्षात ठेवला होता. पोलिसांनी देखील लगेच ‘ऍक्टिव्ह’ होताना तासाभरात या तरुणांना ताब्यात घेतले. याच्यावर गुन्हे दाखल करताना तुरुंगात टाकले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील या घटनेची दखल घेतली.
पुणे पोलिसांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची ट्विट करताना याची माहिती दिली. ट्विट देखील अतिशय गमतीदार होते. ‘चल बैठो घुमने जाते ‘ कोथरूडमध्ये हॉस्टेल बाहेर कारमध्ये बसलेल्या दोघा तरुणांनी ३ मुलींना ‘ कॅज्युअल ‘ बोललेले शब्द #PunePolice ने मात्र ‘कॅज्युअली घेतले नाहीत.’
कोणत्याही प्रकारची महिलांची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असे करणाऱ्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा थेट इशारा पोलिसांनी देताना महिला सुरक्षेसाठी कोणतीच तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.