माळेगाव : माळेगाव व परिसरातील शाळा व कॉलेज येथे टवाळखोर, रोडरोमिओ, अल्पवयीन दुचाकीचालकांवर माळेगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून, पालक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
माळेगाव परिसरातील शाळा-कॉलेजच्या परिसरात पुन्हा एकदा रोडरोमिओ यांनी डोके वर काढले असून, शाळा भरताना व सुटताना रोडरोमिओ यांचा त्रास वाढला आहे. ट्रिपल सीट गाडी चालविणे, मुलींचा पाठलाग करणे, हॉर्न वाजविणे, टॉन्ट मारणे अशा तऱ्हेने त्रास देणे सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे काका पाटोळे, गणेश खंडागळे, धनंजय दडस यांनी विविध शाळा, कॉलेजमध्ये भेट देऊन रोडरोमिओंवर दंडात्मक कारवाई केली.