Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी…! ‘या’ दिवशी लक्ष्मी रस्ता वाहतुकीस राहणार बंद; नेमकं कारण काय? घ्या जाणून…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 6 December 2024, 19:11

पुणे : वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्शवभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

पुणे महापालिकेकडून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, याठिकाणी नागरिकांसाठी करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच हॅप्पी स्ट्रीटचे खेळ आणि रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

 

या कार्यक्रमासाठी हा रस्ता वाहनविरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजवण्याचे काम पथ विभागातर्फे होणार आहे. ११ डिसेंबर रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापर्यंत खास सायकलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पीएमपीएल कडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबईतर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे.

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :

  • लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नगरकर तालीम चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
  • कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शनिपार चौक (चितळे काॅर्नर) येथून वळून बाजीराव रस्तामार्गे अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
  • नारायण पेठेतील लोखंडे तालीम चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नसरापूर हादरवणाऱ्या प्रकरणात आरोपी दोषी; नराधमाला फाशी होणार कि जन्मठेप? जाणून घ्या

Thursday, 25 June 2026, 12:36

पुणे–दौंड रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार? उपनगरीय दर्जा व अतिरिक्त MEMU–DEMU फेऱ्यांची राहुल कुल यांची मागणी

Thursday, 25 June 2026, 12:16

केतन अग्रवाल हत्याकांड! लेकीच्या गुन्हेगारी कृत्याने सिया गोयलच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Thursday, 25 June 2026, 12:00

विश्वराज हॉस्पिटलची मोठी कामगिरी; शस्त्रक्रियेशिवाय TAVR तंत्रज्ञानाने 75 वर्षीय वृद्धाच्या हृदयाची बदलली झडप, रुग्णाला दिले नवे आयुष्य

Thursday, 25 June 2026, 11:47

पाटसमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्यावर काका अन् नातवाचा कोयत्याने हल्ला

Thursday, 25 June 2026, 11:46

‘मानसिक छळ, कमी पगार आणि कामाचा वाढता ताण’ होत असल्याची लिहिली सुसाईड नोट, फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्थेच्या खुले निवारागृहातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Thursday, 25 June 2026, 11:23
Next Post
Police takes action against road Romeo in malegaon baramati pune

बारामतीमधील माळेगावमध्ये टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.