सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील दोडामार्ग झरेबांबर येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोडामार्ग ते बेळगाव मुख्य रस्त्यावर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने रस्ता क्रॉस करणाऱ्या 7 वर्षीय शाळकरी मुलीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीया संदीप गवस (वय-7) असं अपघातात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीया गवस ही 7 वर्षीय शाळकरी मुलगी रस्ता क्रॉस करत होती. त्यावेळी दोडामार्ग ते बेळगाव मुख्य रस्त्यावर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मुलीला जोरदार धडक फिली. या धडकेत मुलगी रस्त्यावर कोसळली आणि तिच्या डोक्यावरून चाक गेले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
जखमी अवस्थेत तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वी तिचा दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान, मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला. अपघातानंतर नागरीकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.