मधुमेह अर्थात डायबिटीज ही समस्या केवळ वयोवृद्धांनाच नाहीतर तरूणांनाही सतावू शकते. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरते. त्यात आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास डायबिटीज नियंत्रणात आणता येऊ शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर या काळात कोणते पदार्थ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
फळे आणि भाज्या खाण्याला प्राधान्य द्या. कच्ची केळी, लिची, डाळिंब, एवोकॅडो आणि पेरू यांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी ठरू शकते. या आजारात सफरचंद, संत्री, डाळिंब, पपई आणि टरबूज खाल्ल्याने योग्य प्रमाणात फायबर मिळू शकते, तर केळी, आंबा आणि द्राक्षे यांसारख्या उच्च उष्मांक असलेल्या फळांचे अतिसेवन टाळावे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे आणि भाज्या खाव्यात.
याशिवाय शरीरात प्रोटीनची मात्रा योग्यप्रकारे राहील याचीही खात्री करा. त्यासाठी कडधान्ये, मांस, अंडी, मासे, चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. चरबीयुक्त पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाण्याचे टाळा. तसेच साखरयुक्त पदार्थ खाऊ नयेत. जास्त साखर असलेला ज्यूस इत्यादींचे सेवन करणे टाळावे.