दीपक खिलारे
इंदापूर : दिव्यांगाच्या अडी-अडचणी शासन दरबारी प्रयत्न करणार असून त्यांच्या मदतीसाठी कायम पाठीशी उभा असल्याचे प्रतिपादन निमगाव केतकीचे माजी उपसरपंच तुषार जाधव यांनी केले. निमगाव-केतकी (ता. इंदापूर) येथे माजी उपसरपंच तुषार जाधव यांच्या वतीने (दि.३) जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तुषार जाधव बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या समस्या समजावून घ्याव्यात. व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
ग्रामपंचतीमधून मिळणारा पाच टक्के निधी अद्याप मिळाला नसल्याची खंत उपस्थित दिव्यांग बांधवानी व्यक्त असता. पाच टक्के निधी लवकरात मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही माजी उपसरपंच तुषार जाधव यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना सांगितले.
यावेळी निमगाव केतकी मध्ये दिव्यांगासाठी काम करणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष भारत शेंडे, सचिव शरद शेंडे, सदस्य तानाजी बरळ व मारुती आदलिंग व संदीप बारवकर यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांचा श्रीफळ देऊन तुषार जाधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.