पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. या बहुमतानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण? यावरून आता पुण्यातील राजकीय वर्तुळात पैजा सुरू झाल्या आहेत. तर्कविर्तक करीत चक्क अमुक एक मुख्यमंत्री झाले, तर पाच किलो पेढे वाटणार, मिसळवर एक मिसळ देण्याचा संकल्प केला आहे. कार्यालयात पेढे वाटण्याची पैज ही अनेकांनी लावली आहे. पुण्यातील नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनेकांनी साकडे घातले आहे.
भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे अनेकांना वाटत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. पुणे जिल्हयातील कार्यकर्त्यांना अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील, असे म्हटले आहे. दादा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याने इतिहासाला अनुकुल मुख्यमंत्री असेल, असाही दावा केला जात आहे.
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील मतदानातून पुण्याचे कारभारी ठरले आहे. पुणे शहर आणि जिल्हयातून अजित पवार यांच्या गटाच्या ८ जागा विजयी झाल्या आहेत. या मुख्यमंत्रीपदाबरोबर पुण्यात आता यावेळी महायुतीच्या मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी महायुतीचा मुख्यमंत्री एक वर्षाकरीता असावा, नंतर दोन इतरांनी मुख्यमंत्री व्हावे, असाही मतप्रवाह व्यक्त केला जात आहे. काहींनी तर ओबीसी मुख्यमंत्री करावा, असे म्हटले आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विधानपरिषदेच्या १२ जागापैकी सहा जागांवर नियुक्ती केली आहे. उर्वरित सहा जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यातही आपली वर्णी लागणार यासाठी तयारीही सुरू करण्यात आली