मुंबई : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी येत्या 4 डिसेंबरला तो विवाह करणार आहे. अशातच मोठ्या भावापाठोपाठ लहान भावानेही आनंदाची बातमी दिली आहे. नागा चैतन्यचा लहान भाऊ अखिल अक्किनेनीचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर त्यानं ही खुशखबर शेअर करत चाहत्यांना आनंदात सहभागी करून घेतलं. त्यांच्या या पोस्टवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
नागार्जुनने धाकटा मुलगा अखिल आणि भावी सून जैनब रावदजी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही आमचा मुलगा अखिल अक्किनेनीच्या एंगेजमेंटची घोषणा करताना फार उत्साही आहोत. आमची भावी सून जैनब रावदजी हिच्यासोबत त्याचा साखपुडा झाला आहे. जैनबचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या जोडप्याचे अभिनंदन आणि आशीर्वाद.
नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटानंतर अक्किनेनी कुटुंबाने या आनंदाच्या क्षणात एकत्र येत, नवा अध्याय सुरू केला आहे. विशेष म्हणजे नागा चैतन्य आणि अखिलच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणांमध्ये एक योगायोगही आहे. मोठ्या भावाचा लग्नसोहळा आणि धाकट्या भावाचा साखरपुडा, या दोन्ही गोष्टींमुळे अक्किनेनी कुटुंबाचा आनंद चौपट झाला आहे.
अखिल अक्किनेनीची जैनब रावदजीसोबत एंगेजमेंट झाल्याची बातमी समोर आली त्यानंतर अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या. अशातच अक्किनेनी कुटुंब शोभिता धुलिपालासोबत नागा चैतन्यच्या लग्नाची तयारीही करत आहे. हे दोघेही येत्या 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
We are thrilled to announce the engagement of our son, @AkhilAkkineni8, to our daughter in law to be Zainab Ravdjee!
We couldn’t be happier to welcome Zainab into our family. Please join us to congratulate the young couple and wish them a lifetime filled with love, joy, and… pic.twitter.com/5KM7BU00bz
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) November 26, 2024