Ind vs Aus : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीज मधील भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवला असून ऑस्ट्रेलियाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना त्यांच्याच मैदानावर चारी मुंड्या चित केले आहे.
या विजयामुळे या सिरीजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३८ धावांवरच रोखला आणि मोठा विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने दुसरा डाव हा 6 बाद 487 वर घोषित केला. टीम इंडियाने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 104 वर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला 46 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं आव्हान मिळालं. विराट कोहली याने 143 चेंडूत शतक पूर्ण केलं. कॅप्टन जसप्रीत बुमराह याने यासह डाव घोषित केला. विराटच्या या शतकी खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं शतक होतं. नितीश रेड्डीने नाबाद 38 धावा केल्या. विराट आणि नितीश या दोघांनी सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली.
भारताची प्लेईंग ११ : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ११ : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.