चाकण : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न केल्याचे भासवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना खेड तालुक्यातील चाकण येथे ७ जुलै ते १४ नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज हनवता हाके (वय २२, रा. धानोरा, इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित १९ वर्षीय तरुणीने चाकंण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनराजने फिर्यादी तरुणीच्या गळ्यात माळा घालून लग्न झाल्याचे भासवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून लग्न न करता पत्नी सारखी वागणूक देत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापितकेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत धनराजवर लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.