IND vs AUS : ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीजला सुरवात झाली आहे. पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची चांगलीच फजिती झालेली दिसून आली आहे. भारताने टॉस जिंकून कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, परंतु हा निर्णय टीम इंडियाच्या फलंदाजांच्या अंगलट आल्याचे बघायला मिळाले. फलंदाजांना पर्थमध्ये टिकाव धरता आला नाही. टीम इंडिया फक्त 150 धावांवर ऑलआऊट झाली. पहिल्या दोन सेशनमध्येच ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची भंबेरी उडवली होती.
भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाचे 11 फलंदाज 50 ओव्हरही फलंदाजी करू शकले नाहीत. संपूर्ण संघ 49.3 ओव्हरमध्येच गारद झाला. डेब्यू सामना खेळणाऱ्या 21 वर्षाच्या नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 37 धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर केएल राहुलने संयमी 26 धावांची खेळी खेळली. टॉसनंतर भारताची सुरुवात ठीक झाली नाही. यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांना खातं सुद्धा उघडता आलं नाही. तर विराट कोहली सुद्धा तग धरू शकला नाही आणि तो 5 धावा करून बाद झाला. त्यानतर ध्रुव जुरेलला देखील लवकर बाद झाला. टेल एन्डर्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीम इंडियाला 200 चा आकडा देखील गाठता आला नाही.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (C), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (WK), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.