पुणे : वडिलांच्या अश्लिल कृत्याचा व्हिडिओ व्हॉटसअॅपवर पाठवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 रोजी घडला आहे. याप्रकरणी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनी राहणार्या एका 41 वर्षाच्या नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुरज राजेंद्र पवार (वय 32, रा. जैनापूर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यक्ती आणि त्याची पत्नी हे दोघेजण घरी होते. त्यावेळी त्यांच्या व्हॉटसअॅपवर फिर्यादी यांच्या वडिलांसोबत केलेल्या अश्लिल कृत्याचा व्हिडिओ आरोपी सुरज पवार याने पाठविला होता. हा व्हिडिओ फिर्यादीच्या नातेवाईक यांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करु नये, यासाठी आरोपी सुरज पवारने 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. दरम्यान, आरोपीने सातत्याने धमकी देणे सुरुच ठेवल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.