नवी दिल्ली : तुम्ही गुंतवणूक करण्यामध्ये इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, तुम्ही जर बँकेत सामन्यपणे पैसे गुंतवून ठेवले असतील तर बँक ठेवींवर खूप कमी व्याज मिळते. मात्र, तुम्हाला तुमच्या बचत खाते किंवा FD सारख्या चालू खात्यावर अधिक व्याज मिळू शकते.
प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना ऑटो स्वीप सेवा पुरवते, ज्याबद्दल अनेकांना माहितीही नसते. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यावर दुप्पट नाहीतर तिप्पट व्याज मिळवू शकता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त बँकेत जाऊन या स्कीमची माहिती द्यावी लागेल. तुमच्या बचत खात्यात जमा केलेली रक्कम एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास किंवा अतिरिक्त निधी असल्यास, ते आपोआप मुदत ठेवी म्हणजेच FD मध्ये हस्तांतरित केले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला बचत खात्यावरील व्याजऐवजी बँक एफडीवरील व्याजदराचा लाभ मिळतो.
सध्या विविध बँकांकडून ऑटो स्वीप सेवा पुरवली जात आहे. तुम्हाला या सेवेसह उघडलेल्या खात्यावर अधिक व्याज मिळू शकते. जेव्हा तुमच्या बचत किंवा चालू खात्यात जमा केलेली रक्कम स्वीपची मर्यादा ओलांडते तेव्हा ऑटो स्वीप सुविधा सक्रिय होते. जर तुम्ही ते कसे कार्य करते ते पाहिल्यास, तुम्हाला तुमच्या खात्यात एक मर्यादा सेट करावी लागेल आणि त्यानंतर तुमची ठेव थेट FD मध्ये रूपांतरित केली जाईल. यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.