मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलियन संघातील बॉर्डर गावसकर करंडकमध्ये रवीचंद्रन अश्विन आणि स्टीव स्मिथ यांच्यातील द्वंद सर्वश्रुत आहे. अश्विनसारख्या तरबेज फिरकीपटू वरचढ होणे ऑस्ट्रेलियन संघाला मारक ठरू शकते. यामुळे त्याच्याविरोधात सक्रिय होण्याची गरज असल्याचे स्मिथ म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील २०२०-२१ मधील मालिकेत अश्विनने तीनदा स्मिथला बाद केले होते, तर २०२३ मध्ये स्मिथला दोनवेळा आपल्या जाळ्यात ओढण्यास अश्विन यशस्वी ठरला होता. आगामी मालिके अगोदर ऑस्ट्रेलियातील नामांकित वर्तमानपत्राशी संवाद साधताना स्मिथ म्हणाला की, ऑस्ट्रेलियात ऑफ स्पिनरविरुद्ध बाद होणे आवडत नाही. तथापि, तो खूप चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या योजना स्पष्ट असतात.
मैदानावर असे काही प्रसंगात तो माझ्यावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. सिडनीतील गत कसोटीत सक्रियवृत्ती अंगीकारल्यामुळे दडपण झुगारून देण्यात यशस्वी ठरलो होतो. अशा परिस्थितीत, त्याच्याविरुद्ध सक्रिय फलंदाजी करणे आणि त्याला लय मिळू न देणे हे दोन पर्याय खुले आहेत. भारताविरुद्ध तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.