पुणे : राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने आज प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावल्या आहेत. मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, बैठका, रोड शो, जाहीर सभा या सर्वांना आज सायंकाळी सहानंतर ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबरच मतदानाआधी म्हणजेच 18 तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केली जाणार आहे.
19 तारखेला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 तारखेला राज्यात ड्राय डे असेल. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 18, 19, 20 आणि 23 असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे. नेमकी ही मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल हे जाणून घेऊयात…
- 20 नोव्हेंबर : निवडणुकीचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर बंद राहणार आहे.
- 23 नोव्हेंबर : मध्यरात्री 12 वाजता दिवस सुरु होतो तिथपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत मद्यविक्री बंद असणार आहे.
मतदानाच्या 48 तास आधी ड्राय डे घोषित करण्याचा नियम निवडणूक आयोगाने ठरवला आहे, याचा उद्देश मतदारांना लाच म्हणून दारू वितरण टाळणे आहे. त्यामुळे मतदानाच्या अगोदर आणि निकालाच्या दिवशी राज्यभरात दारूची विक्री थांबवली जाते. त्यामुळे दारू विक्रीची दुकाने, बार, बिअर बार सर्व बंद असणार आहेत.