पुणे : राज्यातील काही भागात परतीचा पाऊस झाला आहे. यामुळे थंडीचे सुद्धा उशिरा आगमन झाले. सध्या जरी थंडी पडत असली तरी राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीची प्रतीक्षा कायम आहे. सकाळी थंडी, दुपारी उष्णता आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या राज्यात आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढत असून किमान तापमानात घट होत आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सातारा, पुणे आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पुढील २४ तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. राज्यातील तापमानात किमान 2 ते 3 अंशाची घट होणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर आणखीनच वाढणार आहे.
राज्यातील सातारा, पुणे व कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरात धुके वाढणार आहे. पुण्यात सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. तर तापमाणात देखील घट झाली आहे. तर नाशिक, निफाड येथे देखील तापमानात घट झाल्यामुळं थंडी वाढल्याचं जाणवत आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.