नवी दिल्ली : सध्या सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील बँकांकडून आपल्या ग्राहकांना एटीएमकार्डसह आता क्रेडिट कार्डही दिले जात आहेत. काही बँका हे क्रेडिट कार्ड मोफत देतात तर काही बँका यासाठी वार्षिक शुल्क आकारतात. जर तुमच्याकडे ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे.
ICICI बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत, ज्यात फायनान्स चार्ज, लेट पेमेंट चार्ज, युटिलिटी ट्रान्झॅक्शन आणि इंधन व्यवहार यासारख्या नियमांचा समावेश आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये वित्त शुल्क बदलण्यात आले आहे. थकीत आणि आगाऊ पैसे काढल्यावर, महिना आणि वर्षानुसार वेगवेगळे व्याज द्यावे लागेल. बँकेने थकीत कर्जावरील मासिक व्याज 3.75 टक्के निश्चित केले आहे. त्याच वेळी, आगाऊ काढलेल्या पैशावर समान व्याज द्यावे लागणार आहे.
याशिवाय, विलंब भरणा शुल्क अर्थात लेट फीबाबत देखील बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 101 ते 500 रुपये थकबाकी असल्यास, 100 रुपये विलंब शुल्क म्हणून भरावे लागतील आणि 501 ते 1000 रुपये थकबाकी असेल. , 500 रुपये विलंब शुल्क म्हणून भरावे लागतील, असे बँकेने म्हटले आहे. याबाबतची सविस्तर माहितीच बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.