सध्या बदलत्या जीवनशैलीत अनेक आजार न कळतपणे उद्भवू शकतात. त्यात डायबिटीस अर्थात मधुमेह, रक्तदाबाची समस्या जाणवू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढली की काही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे ही साखरेची पातळी नियंत्रणात कशी राहील, याकडे लक्ष देणं गरजेचं बनतं.
जर तुम्हालाही डायबिटीसची समस्या जाणवत असेल तर आहारात बाजरीचा समावेश केल्यास साखरेचे प्रमाण सहज नियंत्रणात आणता येऊ शकणार आहे. मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी खाण्याच्या सवयी सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तांदूळ आणि गव्हाऐवजी बाजरी खाण्याला प्राधान्य द्या. बाजरीमध्ये अनेक पोषकघटक असतात. त्यामुळे त्याचा आहारात समावेश असेल याकडे लक्ष द्यावे. ब्राउनटॉप बाजरी किंवा हिरवी कांगणी देखील मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते, कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि त्यात भरपूर फायबर असते.
डायबिटीसच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात फॉक्सटेल बाजरी म्हणजेच कांगणीचा समावेश करावा. हे धान्य अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असे आहे आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते. फॉक्सटेल ज्वारी किंवा कांगणी यांचा नियमित आहारात समावेश करता येतो. यामुळे टाईप 2 मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. बाजरी कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रोटीनने समृद्ध मानली जाते जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यात लोह आणि व्हिटॅमिन बी देखील मोठ्या प्रमाणात असते.