पुणे : म्हाडा पुणे विभागाकडील ६ हजार २९४ घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर होती. आता त्यास मुदतवाढ देण्यात आली असून, नागरिकांना म्हाडाच्या घरांसाठी १० डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर सोडत ७ जानेवारी २०२५ रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
दरम्यान, म्हाडाच्या ६ हजार २९४ घरांसाठी आतापर्यंत ३० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास १० ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झाली. दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. ती मान्य करत म्हाडाने या सोडतीस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोडतीचे नवीन वेळापत्रक: ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुदत १० डिसेंबर २०२४, ऑनलाइन पेमेंट, अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – १२ डिसेंबर २०२४, सोडत – ७ जानेवारी २०२५