पुणे : शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कसबा, पर्वती, खडकवासला, हडपसर, वडगावशेरी, कोथरूड मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा उद्या (शनिवार, दि. १६) सायंकाळी ६ वाजता नाना पेठ येथील अहिल्याश्रमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पटांगणात होणार आहे.
पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे यांनी केले आहे. या वेळी सोनू निकाळजे, अविनाश मोरे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.