प्रमोद आहेर
श्रीगोंदा : पाण्याचे नियोजन योग्य झाले तरच आपल्याला पाणी मिळते आमदार बबनराव पाचपुते यांनी नेहमीच पाण्याचे योग्य नियोजन केले आहे कुकडीचे अस्तरीकरण होणे गरजेचे आहे, म्हणून दादांनी पाठपुरावा करून १६० कोटी रुपयाचा निधी मिळवला आहे. त्यामुळे उद्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेताना आपण योग्य निर्णय घ्याल. असे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी घारगाव येथे प्रचार दौऱ्यानिमित्त बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना विक्रम पाचपुते म्हणाले की, एकदा माझ्यावर विश्वास टाका. मी कधी तडा जाऊ देणार नाही. तालुक्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे कुकडीचे पाणी आहे. पाणी सुटल्यावर आपल्याला उशीरा मिळते. याचे कारण पुणे जिल्ह्यात कुकडीच्या वितरिकांमध्ये पाण्याची गळती होते म्हणून आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून १६० कोटीचा अस्तरीकण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला व लवकरच काम ही पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्याला लवकर आवर्तन मिळणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.
त्यामुळे जनता योग्य निर्णय घेणार आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एकदा मदत करा असे आवाहन पाचपुते यांनी केली. यावेळी भाजपचे नेते भूषण बडवे म्हणाले विक्रम पाचपुते यांच्यासारखा अभ्यासू उमेदवार आपल्याला मिळाला आहे. स्थानिक प्रश्नाची जन असणारे व्यक्तिमत्व आहे. विक्रम यांची उमेदवारी ही जनतेसाठी आहे. तर विरोधकांची उमेदवारी ही स्वार्थासाठी आहे. आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून विक्रम पाचपुते यांनी राज्यात सर्वाधिक निधी आणला आहे.
पदावर नसताना निधी खेचून आणण्याची हातोटी विक्रम यांच्यात आहे, त्यामुळे या निवडणुकीत विरोधक विकासावर बोलत नाहीत. फक्त पाचपुते कुटुंबावर टीका करायची एवढाच मुद्दा आहे. बाकी सर्व स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून विरोधक निवडणूक लढवत आहेत, असे भूषण बडवे म्हणाले. यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी पणन महासंघाचे चेअरमन दत्तात्रय पानसरे होते. यावेळी, अशोक कळमकर, रघुनाथ खामकर, विष्णू खामकर, देविदास थिटे, चंद्रशेखर कळमकर, सोनाली थिटे, विद्या जाधव, कांचन चौधरी, विशाल शिंदे, आदिनाथ बांदल, अविनाश हराळ, संकेत जंजिरे, नारायण खामकर, महेश पानसरे, दीपक खामकर, विठ्ठल थिटे, दिलीप थिटे, बाळासाहेब थिटे, दिपक कणसे, लक्ष्मण खामकर, आप्पासाहेब शिंदे, विश्वनाथ कळमकर, सोपान शिंदे, माऊली हिरवे, दिलीप रासकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल मोळक यांनी केले तर आभार किशोर थिटे यांनी मानले.