पुणे: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पत्राशेड किंवा तात्पुरत्या स्वरूपात उभे केलेले ७ जुने मतदान केंद्र नवीन ठिकाणी स्थलांतरित केली आहेत. मतदारांनी झालेल्या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार मतदान केंद्रांवर मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे.
यादी भाग ७४-स्पायसर कॉलेज प्राथमिक शाळा औंध हे मतदान केंद्र रोहन निलय-१ सहकारी हौसिंग सोसायटी येथे स्थलांतरित केले आहे. यादी भाग १३४-स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, मनपा, विद्यानिकेतन, विद्यापीठ गेट, गणेशखिंड रोड येथील मतदान केंद्र १० कस्तुरकुंज सहकारी हौसिंग सोसायटी येथे, यादी भाग ७६-पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथे असणारे मतदान केंद्र माऊंट व्हर्ट पीर्सस्टाईन सहकारी हौसिंग सोसायटी येथे, यादी भाग २५२ आणि २५३-सिम्बायोसिस कॉलेज, सेनापती बापट रस्ता येथील मतदान केंद्र कपिला सहकारी हौसिंग सोयायटी, गोखलेनगर येथे, तर यादी भाग ४६-आरोग्य कोठडीमध्ये असलेले मतदान केंद्र पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
यादी भाग १६२ आणि १६३ तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेले मतदान केंद्र सेंट फ्रान्सिस हायस्कूल, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर येथे, तर यादी भाग २६२ तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेले मतदान केंद्र हे शासकीय तंत्रनिकेतन व वाणिज्य केंद्र, घोले रोड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, असे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.