उरुळी कांचन, (पुणे) : येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन येथे विज्ञान विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.०१ डिसेंबर) “जागतिक एड्स दिन” साजरा करण्यात आला. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयात पोस्टर प्रेसेंटेशन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी पोस्टर प्रेझेन्टेशनचे उदघाटन केले. तसेच आपल्या मनोगतातून एड्स या आजाराविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी या आजाराविषयी जनजागृती करावी असे आव्हान केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत व उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रांगणात हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक प्राध्यापक अनुजा झाटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्याना एड्स विषयी सविस्तर पणे माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रविंद्र मुंढे, कमारुंनिसा शेख, नंदिनी सोनवणे, दिपाली चोधरी, भोईटे, प्रणिता फडके, प्राध्यापक विजय कानकाटे, रेवती आंबेकर हे प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रदीप राजपूत, मोरेश्वर बगाडे, व विशालदीप महाडिक, विसनगरकर यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतीक्षा कोद्रे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. स्वाती मासाळकर यांनी केले. तर आभार विजय कानकाटे यांनी मानले.