लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मटक्याच्या अड्ड्यावर रायटर व मटका चालक यांच्यात बुधवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तुफान हाणामारी झाली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १० जणांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी समीर मलंग पठान (वय – १८ रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहुल खेडेकर, सागर खेडेकर रा. दोघेही माळीमळा, खेडेकर गरेज समोर लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अशोक बाबुराव खेडेकर (वय-६२, रा. महात्मा फुले नगर, माळीमळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निजाम इस्माईल शेख (वय-५०), शाहरुख निजाम शेख (वय-२४), सलमान निजाम शेख (वय-३१) शाईन शाहरुख शेख, शाईनची बहिण व आणखी तीन जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मटक्याच्या धंद्यावर निजाम शेख हा रायटर म्हणून काम करीत होता. तर त्या मटक्याचे मालक राहुल खेडेकर, सागर खेडेकर यांनी पैशाच्या कारणावरून शेख याला दुपारी मारहाण केली होती. सदर भांडणे दुपारी मिटली असताना राहुल व सागर खेडेकर यांनी परत सायंकाळी शेख याला मारहाण केली.
सदरची घटना त्याच्या घरातील महिलांनी पाहिले असता सदर भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली होती. त्यांनाहि खेडेकर यांनी मारहाण केली. रायटरच्या घरातील महिलांनाहि मारहाण झाल्याने त्यांनी पुणे – सोलापूर महामार्गावर झोपल्या होत्या. ते झोपल्याने महामार्गावर वाहनांच्या १० ते १२ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर पुणे-सोलापूर महामार्ग तब्बल १५ ते २० मिनिटे बंद झाला होता.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सदर भांडणात दोन्ही बाजूकडील १० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणाचा तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे व किरण धायगुडे करीत आहेत.