पुणे : दिवाळी/छठपूजा सणानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर-बिकानेरदरम्यान विशेष दोन गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बिकानेर-हडपसर विशेष गाडी बिकानेर येथून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी हडपसर येथे पोहोचणार आहे.
तर, हडपसर-बिकानेर विशेष गाडी १० नोव्हेंबर रोजी हडपसर येथून रात्री ८ वाजता सुटणार असून, बिकानेरला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, फुलेरा, कुचमन शहर, मकराना, देगाणा, मेड़ता रोड, नागपूर आणि नोखा आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.