लोणी काळभोर : नैसर्गिक विधी करण्यासाठी स्वच्छतागृहाकडे चाललेल्या एका २१ वर्षीय विवाहितेला रस्त्यात पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील साठेवस्ती परिसरात मंगळवारी (ता.५) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात छेडछाडीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंकदर चाँद शेख (वय ३३, रा. साठेवस्ती, रामदरा रोड, लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी एका २१ वर्षीय विवाहितेने लोणी काल्भीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून लोणी काळभोर परिसरात राहतात. मंगळवारी (ता.५) रात्री फिर्यादी या नैसर्गिक विधी करण्यासाठी स्वच्छतागृहाकडे चालल्या होत्या. तेव्हा सिंकदर चाँद शेख याने पिडीतेचा रस्ता अडवला. तु मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, मी तुला सोडणार नाही, मला तुझ्याशीच शारीरीक संबंध ठेवायचे आहे. असा आरोपी सिंकदर चाँद शेख पिडीतेला म्हणाला.
त्यानंतर आरोपी सिंकदर चाँद शेख याने पिडीतेच्या डाव्या हाताला पकडुन अंगावरून हात फिरविला. तेव्हा पिडीतेने तेथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने पिडीतेची ओढणी धरुन विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. व पिडीतेच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन केले. तसेच याबाबत पिडीतेच्या
नवऱ्याला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी सिंकदर चाँद शेख याच्यावर भारतीय न्याय दंड संहिता कलम 74,76, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.