इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघात वय वर्ष 85 वरील एकूण 168 मतदारांचे गृह भेटीत मतदान प्रक्रिया दि 09 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्यची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे.
सदर गृह भेटीत मतदान करून घेण्यासाठी एकूण 15 पथकांचे गठन करण्यात आले आहे. त्यामध्ये एक अधिकारी, एक मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई, एक व्हिडिओ ग्राफर व एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार इंदापूर जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी सचिन खुडे , गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात व निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांनी तहसील कार्यालय इंदापूर येथील सभागृहात दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत सदर मतदान प्रक्रियेबाबत सखोल प्रशिक्षण दिले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली.