मुंबई : सध्या बँकिंग संबंधित अनेक बदल झालेले आहेत. त्यात बँक लॉकर सुविधांचा चार्ज, सिक्युरिटी आणि नॉमिनेशनशी संबंधित काही नियम नुकतेच बदलण्यात आले आहेत. हा बदल SBI, ICICI, HDFC आणि PNB सारख्या देशातील प्रमुख बँकांमध्ये लागू केला जाणार आहे. या सर्व बँकांच्या शुल्काचा तपशील आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
ग्राहकाला वैयक्तिकरित्या, संस्था अथवा मर्यादित कंपन्या, क्लब यांसारख्या विविध श्रेणीतील ग्राहकांना बँक लॉकर सुविधा बँकांकडून पुरविल्या जातात. मात्र, बँका 18 वर्षांखालील मुलांच्या नावाने लॉकरची सुविधा उपलब्ध करून देत नाही. बँका त्यांच्या ग्राहकांना एकप्रकारे भाडेतत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून देतात. ही सुविधा देताना वार्षिक चार्जेसच्या आधारावर काहीवेळा लॉकर सेवा दिली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, बँका ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारीही स्वीकारतात.
एका अहवालानुसार, SBI, ICICI बँक, HDFC बँक आणि PNB या बँकांकडून त्यांच्या लॉकरच्या चार्जमध्ये वाढ केली जाणार आहे. बँकांचे हे चार्ज बँकेच्या शाखा, त्याचं ठिकाण आणि लॉकरच्या साईजनुसार बदलू शकतात. बँकेने नवीन दर जाहीर केले आहेत. बँक ग्राहकांना 12 फ्री व्हिजिटची सुविधा देते. तर त्यापेक्षा अधिक झाल्यास प्रत्येक अतिरिक्त व्हिजिटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.