उरुळी कांचन, (पुणे) : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नामांकित सुवर्ण व प्लॉटिंग व्यावसायिकावर आयकर विभागाने आज बुधवारी (ता. 06) पहाटे धाड टाकली आहे.
पहाटेपासून हि कारवाई सुरु असून त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात असलेल्या आणखी काही व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, 22 ऑक्टोंबर रोजी पूर्व हवेलीतील एका बड्या राजकीय नेत्यासह आठ प्लॉटिंग व्यवसायिकांवर आयकर विभागाचे छापे टाकले होते. मागील 15 दिवसात पूर्व हवेलीत दोन वेळा आयकर विभागाची धाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात