Cricket : नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी मलिकतेत भारताचा पराभव हा झाला आहे. याआधी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं, ते या मालिकेत घडलं आहे. त्यामुळे मोठं मोठ्या दिग्गज खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंवर टीका केली जात आहे. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने दावा केला आहे की, पाकिस्तानचा संघही भारतीय संघाला पराभूत करू शकतो.
दोन्ही देशांसाठी नक्कीच ही आनंदाची बाब असेल..
पाकिस्तानचा संघ सद्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान वसीम अक्रम समालोचन करत होता. त्यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील समालोचनकक्षात हजर होता. दरम्यान दोघांमध्ये भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेबाबत चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असताना मायकल वॉन म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १ कसोटी मालिका व्हायला हवी. यावर उत्तर देत वसीम अक्रम म्हणाला की, क्रिकेटची आवड असणाऱ्या दोन्ही देशांसाठी नक्कीच ही आनंदाची बाब असेल. भारतातील स्पिनिंग ट्रॅकवर पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करु शकतो. भारताला न्यूझीलंडने मायदेशात खेळताना ०-३ ने हरवलंय.’
भारतीय संघावर जहरी टिका करणाऱ्या वसीम अकरमच्या या वक्तव्याची सद्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने घरात घूसून पाकिस्तानला धूळ चारली होती. न्यूझीलंडचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी एक आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टफ फाईट झाली आणि शेवटी न्यूझीलंडने त्यामध्ये बाजी मारली. पण बांगलादेश हा तितका मजबूत संघ नाही. तरीसुद्धा बांगलादेशने मायदेशात येऊन पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.